फलटण येथे पत्रकार दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

फलटण : क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन करताना रघूनाथराजे नाईक निंबाळकर जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे आमदार दिपकराव चव्हाण रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रांत संतोष जाधव उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील तहसिलदार विजय पाटील अजय माळवे आदी.

फलटण, दि. 6(प्रतिनिधी)- पत्रकार दिनानिमित्त फलटण शहर व तालुका पत्रकार संघाच्यावतीने सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष, शिवसंदेशकार, माजी आमदार कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृतिप्रितर्थ क्रिकेट स्पर्धेचा घडसोली मैदान फलटण येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मार्केट कमिटीचे चेअरमन रघूनाथराजे नाईक निंबाळकर जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, आमदार दीपकराव चव्हाण, स्वराज उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, आरोग्य समितीचे सभापती अजय माळवे प्रांताधिकारी संतोष जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील, तहसिलदार विजय पाटील, नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, भाजपाचे बजरंग गावडे, मनसेचे युवराज शिंदे, कॉंग्रेसचे जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दादासाहेब चोरमले, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गेली 8 वर्षे या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होत असून राजकीय नेते, शासकीय अधिकारी/कर्मचारी, डॉक्‍टर, वकील, शिक्षक, पत्रकार यांच्या चुरशीच्या लढती पाहण्यास मिळतात. आजच्या प्रदर्शीय सामना पत्रकार विरुद्ध शासकीय/ राजकीय असा झाला. यामध्ये राजकीय/ शासकीय संघाने 21 धावांनी पञकार संघावर विजय मिळवला. तर दिवस भरात वाय. सी हायस्कुल विरुद्ध यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मुधोजी हायस्कूल विरुद्ध महावितरण फलटण, पोलिस विभाग विरुद्ध शेतीशाळा, महसूल विभाग विरुद्ध पंचायत समिती, नगर परिषद विरुद्ध वनविभाग असे सामने झाले. या आगळ्यावेगळ्या स्पर्धा पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील क्रिकेटप्रेमींनी हजेरी लावली.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)