फलटण पोलिसांनी केले अट्टल गुन्हेगार जेरबंद

फलटण, दि. 10 (प्रतिनिधी) – विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये फरारी असलेला सचिन चव्हाण या अट्टल गुन्हेगारास दि 9 राजी दुपारी 12-30 वाजण्याच्या सुमारास फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने गिरवी-फलटण रस्त्यावर झिरपवाडीच्या हद्दीमध्ये पाठलाग करुन अटक केली.
सचिन हनुमंत चव्हाण (वय 33) रा. कुरवली खुर्द, ता. फलटण, सचिन भिसे व सचिन मदने या तिघांच्या विरुद्ध मागील काही वर्षामध्ये फलटण, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर येथील पोलीस ठाण्यांमध्ये वाटमारी, दरोडे, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी सचिन चव्हाण याने उपळवे, ता. फलटण येथील पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला होता. सचिन चव्हाण याचा सातारा स्थानिक गुन्हे शाखा, फलटण ग्रामीण व शहर पोलीस ठाणे त्याचा युद्धपातळीवर शोध घेत होते.
दरम्यान दि.9 रोजी सकाळी सचिन चव्हाण कुरवली खुर्द या त्याच्या घरी येणार असल्याची माहिती फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी देवानंद तुपे, वाडकर, जगदाळे व अवघडे यांनी अटक करण्यासाठी सापळा रचला होता. त्यानंतर दुपारी 12-30 वाजण्याच्या सुमारास विंचुर्णी, ता. फलटण येथे दुचाकीवरुन जात असताना मागावर असलेल्या पथकाने त्याचा पाठलाग केला. त्यावेळी त्याने दुचाकी न थांबवता गिरवीच्या दिशेने वेगाने नेहली. गिरवी-फलटण रस्त्यावर असणाऱ्या अमृता गार्डन या ढाब्यासमोर त्याला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता सचिन चव्हाण याने पथकातील तुपे व जगदाळे यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेतही तुपे व जगदाळे यांनी चव्हाणला पकडले. या घटनेत यामध्ये पोलिस कर्मचारी तुपे व जगदाळे जखमी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)