फलटण पूर्व भागात पाणी टंचाईचे संकट

गोखळी, दि. 4 (वार्ताहर) – फलटण तालुका रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो. सर्वच नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. फलटण तालुक्‍याच्या पूर्व भागातील नीरा उजवा कालवा व नीरा नदीच्या मधला सधन पट्ट्यात भविष्यात पाणी टंचाईची चाहूल लागली आहे.

पूर्व भागातील भागायची भागातील विहिरी कॅनॉल व नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कॅनॉलमधील पाणी आटले की विहिरीच्या पाणी पातळीमध्ये घट होते. विहीर सांगळ्यावर येतात. यावर्षी ऐन पावसाळ्यात पाऊस न पडल्यामुळे ओढे खळखळून वाहिले नाहीत. पावसाने ओढ दिल्याने विहिरीच्या पाणी पातळी खालावली आहे. शेतकरीवर्गाला भविष्यातील पाणी टंचाईच्या काळजीने ग्रासले आहे. पावसाअभावी नुकत्याच लागवड केलेल्या उसास खोड किड लागली आहे. तोडणीला आलेल्या ऊस पिकास हुमणी मोठ्या प्रमाणात लागली असून पालेभाज्यांवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. महागडी जंतुनाशक औषधे फवारणी करून पिकांचा रोगापासून बचाव करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर गुरूवारी मध्यरात्री
पावसामुळे दिलासा मिळाला. अद्याप मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. जून महिन्यात धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडला आहे. धरणे भरलेल्याने आशादायी चित्र निर्माण झाले. परंतु, पूर्व भागात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरीवर्गाला चिंतेने ग्रासले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)