फलटण पालिका शाळेत आज चष्मे वाटप

फलटण, दि. 1 (प्रतिनिधी) फलटणमध्ये दि. 2 रोजी दुपारी चारला फलटण नगरपालिकेच्या सभागृहात ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते गणवेश वाटप व महिला व बालकल्याण समिती यांच्यावतीने चष्मे वाटप करण्यात येणार आहे. आ. दीपक चव्हाण अध्यक्षस्थानी राहणार आहेत तर आ. राहुल नार्वेकर, फलटण मार्केट कमिटी चेअरमन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, जि. प. सदस्य शिवांजली नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांची उपस्थिती राहणार अशी माहिती शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती सौ. प्रगती कापसे व महिला व बालकल्याण सभापती ज्योत्स्ना शिरतोडे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)