फलटण-नाना पाटील चौकातील वाहतूक बाहेरून वळवावी

फलटण , दि. 25 (प्रतिनिधी)- फलटण शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून या चौकात सातत्याने वाहतूक ठप्प होत असल्याने नागरिकांतून तीव्र भावना व्यक्त केल्या जात असून याचा त्रास नागरिकांना विशेषतः शालेय विद्यार्थी, महिलांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. या चौकात सातत्याने वाहतूक कोंडीमुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचा बळी गेला आहे तरी या चौकातून जाणारी वाहतूक शहराबाहेरून रिंग रोड काढून वळवावी अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दशरथ फुले यांनी केली आहे.
येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकातून पुणे-पंढरपूर तसेच नगर – सांगली हे महामार्ग जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची वरदळ मोठ्या प्रमाणात असते तसेच या रस्त्यावरून पंढरपूर, शिखर शिगणापूर, जेजुरी, तुळजापूर गाणगापूर अक्कलकोट, गोंदावले, म्हसवड, शिर्डी तसेच इतर तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविकांची संस्था फार मोठ्या प्रमाणात आहे. या चौकालगत फलटण एसटी बसस्थाक असल्यामुळे एसटीच्या मोठ्या प्रमाणात फेऱ्या या चौकातून होत आहेत. सध्या साखर कारखाने सुरू झाले असून जिल्ह्यातील तसेच जिल्हयाबाहेरील सहा ते सात साखर कारखान्यास ऊस या चौकातून जात आहे. त्यामुळे सततच्या वर्दळीमुळे वहातूक सतत ठप्प होत आहे. सध्या लग्न हंगामात सुरू असून सततच्या वाहातूक कोंडीमुळे लग्न समारंभाला वेळेवर पोहचने अवघड झाले आहे.
फलटण शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या, वाढते व्यावसायिक, वाढती वाहनांची संस्था पहाता ही वाहतूक फलटण शहराबाहेरून रिंग रोड काढून वळवण्याची आवश्‍यकता असल्याचे दशरथ फुले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी प्रशासन यांनी लक्ष घालून या चौकातील वाहतूकीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा फुले यांनी दिला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)