फलटण तालुक्‍यात वळीवाचा हाहाकार

फलटण – फलटण तालुक्‍यात रविवारी रात्री आलेल्या चक्रीवादळामुळे आतोनात नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील वीज, पाणी, दूरध्वनीसेवा कोलमडून पडली होती. वादळामुळे मोठमोठी झाडे अक्षरश: उन्मळून पडली होती. रस्त्यावरच पडलेल्या झाडांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प झाले होते. दरम्यान, जाधववाडी येथील एका घराची भिंत पडून महिला ठार झाली असून सोनवडी बुद्रुक येथे दोघे जखमी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बऱ्याच दिवसांपासून फलटण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर उष्मा जाणवत होता. वळीवाच्या पावसाने हुलकावनी दिली होती. रविवारी रात्री पाऊस पडणार अशी अटकळ जाणवत असतानाच साडेनऊ वाजता वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. पाऊस कमी आणि वारे प्रचंड अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बरड, विडणी, राजाळे, गिरवी, निरगुडी, ठाकुरकी, जाधववाड़ी, कोळकी, गोखळी, भागातील अनेक गावांना वादळ वाऱ्याने आणि पावसाने झोडपून काढले आहे. अनेकांच्या घरांची पत्रे उडून गेली आहेत. भिंती पडल्या आहेत. शहरात अनेक झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

अनेक घरांचे तसेच जनावरांच्या गोठ्यांचेही पत्रे उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण तालुक्‍यातील वीज बंद आहे. वीज मंडळचेही लाखो रूपयांचे नुक्‍सान झाले. यामुळे शहरातील पाणी, फोन सेवा बंद आहे. नगरपालिकेने आपत्कालीन बैठक बोलविली असून सकाळपासून नगराध्यक्षा निता नेवसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी शहरात पाहणी केली तर तहसीलदार विजय पाटील यांनी ग्रामीण भागातील नुकसानीची पाहणी केली. यामध्ये शहरातील तीसहून अधिक घरांचे, दुकानांचे पत्रे उडून गेले. पाऊस कमी आणि वादळवारे जास्त असल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेती व घर मालमत्तांचे नुकसान झाले. फलटण शहरारासह कोळकी, विडणी, जाधववाडी, निरगुडी, धुळदेव, अलगुडेवाडी या परिसरात घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)