फलटण तालुक्‍यातील 107 किमी रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा

file pic

फलटण – फलटण तालुक्‍यातील सुमारे 107 किलोमीटर लांबीच्या इतर जिल्हा मार्गाचे रुपांतर शासन निर्णयानुसार प्रमुख जिल्हा मार्गात करण्याचे निश्‍चित केले आहे. यासाठी विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून पाठपुरावा सुरु होता. त्यामुळेच हे शक्‍य झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

या शासन निर्णयाचे फलटण तालुक्‍यातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून नीरा-देवघर, धोम-बलकवडी या पाटबंधारे प्रकल्पाद्वारे तसेच कमिन्सच्या 8 विविध प्रकल्पाद्वारे याशिवाय संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून कृषी खाते आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्‍यात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे तालुक्‍यातील शेती आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे.
असे असताना दळण वळणासाठी रस्ते दर्जेदार असण्याची आवश्‍यकता लक्षात घेऊन शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जावाढ आणि सुधारणेला रामराजे यांनी विशेष लक्ष दिल्याने मुख्य रस्त्यासह सर्वच रस्त्यामध्ये मोठी सुधारणा होत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या शासन निर्णयानुसार तरडगाव-सासवड-घाडगेवाडी-शेरेवाडी हा 17 कि. मी. रस्ता, गिरवी-दुधेबावी-वडले-पिंप्रद-राजाळे-सांगवी हा 28 कि. मी. रस्ता, सासकल-भाडळी बु-सोनवडी बु-विडणी-सांगवी हा 23 कि. मी. रस्ता, पवारवाडी-हणमंतवाडी-मुंजवडी-राजुरी-कुरवली बु-आंदरुड-जावली हा 25 कि. मी. रस्ता, बरड-निंबळक-टाकळवाडे हा 6 कि. मी. रस्ता अनुक्रमे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 86, 87, 88, 89 आणि 90 मध्ये बदलण्यात आले आहेत.

त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जिल्हा मार्गांची लांबी 107 कि. मी. ने वाढून ती 2456 कि. मी. होणार आहे. फलटण तालुक्‍यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती प्रतिभाताई धुमाळ, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर व सर्व सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)