फलटणला मराठा बांधवांचे ठिय्या आंदोलन

संपूर्ण तालुक्‍यात कडकडीत बंद : युवकांची दुचाकी रॅली

फलटण, दि. 9 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण फलटण तालुक्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, मराठा युवकांनी फलटण शहरातून रॅली काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
फलटणमध्ये सकाळपासून व्यापार, विक्रेते, व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवसाय बंद ठेवत मराठा आरक्षणाच्या बंदला पाठिंबा दिला. महाराष्टात बंद असल्याचे जाहीर करण्यात आल्याने तालुक्‍यातील सर्व व्यवहार पूर्ण बंद होते. मराठा समाजातील अनेक युवक मोटार सायकल रॅलीद्वार शहरातून फिरून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होते. शहरातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या सर्वाना श्रद्धांजली वाहण्यात आली. सयोजकांच्या वतीने उपस्थितना शांततेत आंदोलन करण्याची शपथ देण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पूतळ्यासमोरील चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बंदच्या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालयांनीही सुट्टी जाहीर केली होती. सर्वसामान्यांची एसटी सेवाही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे फलटण बसस्थानकात शुकशुकाट जाणवत होता. पोलिस प्रशासनाने शहर व ग्रामीण भागात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तालुक्‍यातील पेट्रोलपंप, शाळा, कॉलेजेस व जीवनावश्‍यक वस्तूंच्या विक्री करणारी दुकाने बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)