फलटणला उद्या राष्ट्रवादी महिला आघाडीचा मेळावा

फलटण – येथील जिल्हा बॅंकेच्या सभागृहात दि. 4 रोजी सकाळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्षा सौ. लतिका अनपट यांनी दिली.

मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे आणि भूमिका महिलांसमोर मांडण्यात येणार असून त्यासाठी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ उपस्थित राहून महिलांसमवेत सुसंवाद प्रस्थापित करणार आहेत. आ. दिपक चव्हाण, बाजार समिती सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्‍वजितराजे नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस फलटण शहर व तालुका पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षा प्रा. कविताताई म्हेत्रे, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, जि. प. सदस्या सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. नीताताई नेवसे, पंचायत समिती सभापती सौ. रेश्‍माताई भोसले यांचेही मार्गदर्शन होणार असल्याचे तालुकाध्यक्षा सौ. राजश्री शिंदे, शहराध्यक्षा सौ. मेघा सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)