फलटणमध्ये 9 रोजी नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबीर

कोळकी – फलटण येथील श्रीसदगुरू उपळेकर महाराज सभागृह येथे दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे उद्योजक बनू पाहणाऱ्या मराठा समाजातील तरूण-तरूणींना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मराठा समाज विकास फौऊंडेशनचे अध्यक्ष रविंद्र बर्गे यांनी दिली.

शासनाच्यावतीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान अंतर्गत मराठा समाजातील सामाजिक व अर्थिकदृष्टया मागास तरूणांना सक्षम उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याविषयीची सखोल माहिती, तसेच महामंडळाच्या 10 लाख रूपयांपर्यंतच्या व्याज परतावा कर्जासाठी महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र, कसे मिळवावे, बॅंकेकडे कर्ज मागणी करताना काय तयारी करावी, याविषयीचे सविस्तर मार्गदर्शन नरेंद्र पाटील करणार आहेत. बॅंकेचे अधिकारी यांचीही उपस्थिती राहणार आहे. संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील तरूणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव सुर्यकांत पवार यांनी केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)