फलटणमध्ये 3 फेब्रुवारीला मिस अँड मिसेस फलटण स्पर्धा

कोळकी – फलटण फेस्टिव्हल अंतर्गत पश्‍चिम महाराष्ट्र विभागासाठी मिस ऍण्ड मिसेस फलटण 2019 या स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.00 वा. फलटण येथे आयोजित केल्याची माहिती फलटण फेस्टिव्हल समितीचे कार्याध्यक्ष रणजिसिंह भोसले यांनी दिली.

भोसले म्हणाले, स्पर्धा सर्व शहरातील स्पर्धकांसाठी खुली असुन किडस्‌ ओपन स्पर्धा 2019 या विभागात मुले व मुली यांचा 3 ते 16 वयोगटात समावेश असणार आहे. 3 ते 5 वयोगट 6 ते 9 वयोगट 10 ते 12 वयोगट 13 ते 16 वयोगट या वयोगटातून प्रत्येकी चार उपविजेता अशा सोळा उपविजेत्यातून एका विजेत्याची निवड केली जाईल. विजेत्याची दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. तसेच मिस फलटण 2019 अंतर्गत या विभागामध्ये 18 ते 26 वयोगटातील महिलांचा सहभाग असणार आहे यामधुन विजेत्या स्पर्धकास पुणे फेस्टिव्हलमधील अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिसेस फलटण 2019 या स्पर्धेअंतर्गत फक्त विवाहित महिलांचा सहभाग असेल. या स्पर्धेतील विजेत्यास मिसेस पुणे या स्पर्धेसाठी प्रवेश दिला जाईल. सदर स्पर्धेसाठी तज्ञ पंचाची नेमणूक करणेत आली असुन नांव नोंदणी केलेल्या स्पर्धकांना ग्रासिम मि.इंडिया विवेक पवार हे प्रशिक्षण देणार आहेत. महिलांसाठी प्रथमच एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार असुन या स्पर्धेसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील महिलांनी व मुलींनी आपली नावे नोंदणी 16 जानेवारी अखेर करावी असे आवाहन प्रियदर्शनी भोसले यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)