फलटणमध्ये सीसीटीव्हीचे आज लोकार्पण

फलटण – फलटण शहरात लोकसहभागातून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही संचाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दि. 31 मे रोजी सकाळी 11.30 वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते होत आहे. अध्यक्षस्थानी आ. दिपक चव्हाण राहणार असून जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सीसीटीव्हीसाठी सढळ हाताने सहकार्य केलेल्या देणगीदारांचा ना. रामराजे नाईक-निंबाळकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन शहर सुरक्षा समितीच्यावतीने करण्यात आले आहे. एकूण 88 सी सी टीव्ही बसविण्यात येणार असून त्यापैकी 64 आतापर्यंत बसवण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)