फलटणमध्ये वाळूमाफियांना दणका

अवैध गौण खनिजाचे उत्खननप्रकरणी 31 लाखाचा दंड

फलटण – फलटण तालक्‍यात महसूल विभागाने अनधिकृत गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्यांना दणका देत 31 लाखांचा दंड वसूल केला आहे. 76 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतुकीची रॉयल्टी भरून अतिरिक्त 574 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी तहसीलदार विजय पाटील यांनी 30 लाख 99 हजार रकमेचा दंड बजावला असून ही रक्कम आदेशाच्या तारखेपासून सात दिवसात जमा करायची आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटणच्या गावकामगार तलाठी यांनी दि. 20 ऑक्‍टोबर रोजी पंचनाम्यान्वये फलटण येथील जुनी स्टेट बॅंक कॉलनी येथील विजयकुमार मोतीलाल कोठारी यांच्या मालकीच्या प्लॉटमधील बांधकामाच्या ठिकाणी 574 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतूक कोणत्याही प्रकारचा उत्खनन व वाहतूक परवाना न घेता केल्याची बाब तहसीलदार विजय पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

याबाबत फलटण तहसील कार्यालयाकडून जागा मालक यांना याबाबत नोटीस काढण्यात आलेली होती. या नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार नोटीस मिळाल्यापासून तत्काळ कागदोपत्री पुराव्यासह लेखी खुलासा सादर करण्यास जागामालकास कळवले होते.

त्यावर संबंधिताने दि. 29 ऑक्‍टोबर रोजी तहसील कार्यालयाकडे लेखी खुलासा सादर केला होता. केवळ 76 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतूक करणेकामी रॉयल्टी भरुन परवाना घेतलेला असताना याठिकाणी ठिकाणी 700 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतुक केले असल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले होते.

त्यामुळे रॉयल्टी भरलेला 76 ब्रास व जागेवर शिल्लक असलेला 50 ब्रास असा एकूण 126 ब्रास मुरुम एकूण उत्खनन 700 ब्रासमधून वजा करता 574 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतुक अनाधिकृतपणे केलेचे निदर्शनास आल्याने तहसीलदार विजय पाटील यांनी 30 लाख 99 हजार रकमेचा दंड बजावला आहे. ही रक्कम आदेशाचे तारखेपासून सात दिवसात जमा न केल्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमानुसार वसुलीची आदेश बजावला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)