फलटणमध्ये रंगला ग्रंथप्रकाशनाचा सोहळा

फलटण ः ग्रंथ प्रकाशनप्रसंगी मधू नेते, प्रा. धनंजय चितळे आणि सौ. स्मिता भागवत

फलटण, दि. 3 (प्रतिनिधी) – फलटण नगरीचे भूषण प. पू. डॉ. गोविंद काका उपळेकर महाराज यांच्या 44 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पू. उपळेकर महाराजांचे वंशज रोहन उपळेकर यांनी संकलित व संपादित केलेल्या त्यांच्या चरित्र, स्मृतिकथा व उपदेशावर आधारलेल्या “स्वानंदचक्रवर्ती’ या ग्रंथाचे, तसेच रोहन उपळेकरांनीच खास युवकांसाठी लिहिलेल्या “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा’ या बोधप्रद ग्रंथाचे प्रकाशन उपळेकर महाराजांच्या समाधी मंदिरात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधु नेने, ज्येष्ठ व्याख्याते प्रा. धनंजय चितळे, सृजनरंग प्रकाशनाच्या सौ. स्मिता भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
रोहन उपळेकर यांनी प्रास्तविक करून दोन्ही पुस्तकांची माहिती देत मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यानंतर दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशनानंतर स्वानंदचक्रवर्ती या ग्रंथाला संतवाययाचे ज्येष्ठ अभ्यासक व श्री दत्त संप्रदायाचे अध्वर्यू प. पू. शिरीषदादा कवडे यांनी लिहिलेली सुरेख प्रस्तावना वाचून दाखविण्यात आली. पू. उपळेकर महाराजांचा गौरव करताना ते म्हणाले, विसाव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या अग्रगण्य भगवद्‌ विभुतींमध्ये पू. उपळेकर काकांची गणना होते. पू. काका संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. त्यांचे हे स्वानंदचक्रवर्ती पुस्तक अत्यंत चित्ताकर्षक झालेले असून वाचकाला भावविभोर व अंतर्मुख करणारे आहे.
यावेळी प्रा. धनंजय चितळे, मधु नेने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन झाल्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. समाधी मंदिराचे सभागृह पुणे, मुंबई, चिपळूण, फलटण इत्यादी ठिकाणांहून आवर्जून उपस्थित राहिलेल्या भाविकभक्तांनी भरलेले होते. दोन्ही ग्रंथांच्या प्रती घेण्यासाठी वाचकांची प्रचंड गर्दी झालेली होती. आजच्या पावन पुण्यतिथीचे निमित्त साधून दोन्ही ग्रंथांची सवलतीत विक्री करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)