फलटणमध्ये फोफावताहेत अवैध धंदे

पोलिसांकडून ठोस कारवाई होणे गरजेचे


राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही दुर्लक्ष

फलटण – फलटण येथे दोन हॉटेलवर छापा टाकून चार लाखांच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतल्यानंतर फलटण शहर व तालुक्‍यात अवैध दारुचा महापूर वाहत असल्याचे स्पष्ट झाले असून बनावट दारुमुळे अनेकांचा जीव गेल्यावर राज्य उत्पादन शुल्क लक्ष देणार का? असा संतप्त सवाल जनतेमधून विचारला जात आहे.
फलटण शहरासह तालुक्‍यात गेली अनेक हॉटेल व धाब्यावर मोठ्या प्रमाणात चोरटी देशी व विदेशी प्रकारची दारू विकली जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शहराच्या लगतच असलेल्या कोळकी परिसरात तर किमान 25 हॉटेल्स आहेत.

या हॉटेल्समध्ये विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. याबाबतीत अनेक तक्रारी झाल्यानंतर फलटण पोलिसांनी गुरुवारी रात्री फलटण शहर हद्दीतील कोळकी येथील हॉटेल वास्को व हॉटेल राज येथे छापा टाकला असता स्विफ्ट कार आणि दारू असा 4 लाख 5 हजार256 रुपयांचा मुद्देमालासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोळकी व झिरपवाडी येथे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदशनखाली महिला पोलिस उपनिरीक्षक देसाई व दळवी यांनी सहकाऱ्यांसह जाऊन दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. गुरुवारी रात्री 7 च्या सुमारास पहिल्या छाप्यात झिरपवाडी गिरवीरोड लगत असलेल्या राज हॉटेलच्या पाठीमागे माळात जानबा गोविंद चौबुलकर राहणार- झिरपवाडी, राज हॉटेल ता फलटण यांच्याकडे 2 हजार 236 रुपये किंमतीच्या विनापरवाना देशी दारूच्या 43 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी या आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम (ई) अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास दुसऱ्या छाप्यात कोळकी येथील हॉटेल वास्को येथे हॉटेलच्या पाठीमागे दशरथ बाबाजी गावडे, रा. कोळकी, वास्को हॉटेल ता फलटण हा विनापरवाना तीन हजार वीस रुपये किंमतीच्या अवैध दारू विक्री करताना आढळून आला. तसेच हॉटेलच्या समोर लावण्यात आलेल्या स्विफ्ट गाडी क्रमांक एमएच 11 एके 8009 मध्येही अवैध दारूसाठा आढळून आला. यावेळी गाडीसह 4 लाख 3 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी दशरथ बाबाजी गावडे व गाडीच्या अज्ञात मालका विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम (ई), नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण फलटण तालुक्‍यातील अनेक हॉटेल व धाब्यावर नियम धाब्यावर बसवून देशी व विदेशी मद्याची विक्री सुरू असून याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग लाभापोटी कारवाई करत नसल्याची चर्चा आहे. फलटण तालुक्‍यात अवैद्य दारूवर कारवाई करतेवेळी अनेक हॉटेल व धाब्यांना अवैधपणे मोठ्या प्रमाणात दारूसाठा कोणाकडून व कुठून मिळतो यांचा तपास होणे गरजेचा आहे. फलटण राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कागदावरच असणाऱ्या भरारी पथकाने फलटण तालुक्‍यात अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व धाब्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. फलटण तालुक्‍यात अवैध दारू विक्री सर्वत्र सुरू आहे.

दररोज लाखो रुपयांची दारू विक्री होत असून, याकडे उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करीत आहे. या अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी भविष्यात बनावट दारूचा साठासुद्धा उपलब्ध होऊन त्यातून अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी अवैध दारू विक्रीकडे लक्ष देऊन उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिस विभागाने ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. विक्रीच्या ठिकाणी भविष्यात बनावट दारूचा साठा सुद्धा उपलब्ध होऊन त्यातून अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी अवैध दारू विक्रीकडे लक्ष देऊन उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिस विभागाने ठोस कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)