फलटणमध्ये पोटनिवडणुकीसाठी सहा अर्ज

फलटण – फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 अ च्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार जणांचे सहा अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी दिली.

फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 अ मधील राष्टवादीचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार अर्ज दाखल आहेत अर्ज करण्याची अंतिम मुदत नऊ जानेवारी होती. हा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रभागातून इंछुकांची मोठी संख्या असल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्‍यता धूसर होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिवंगत जगन्नाथ कुंभार यांच्या पत्नी रंजना कुंभार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी 2 अर्ज दाखल केले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूने राजेश आनन्दराव शिंदे यांनी 2 अर्ज तर प्रवीण अडसुळ यांनी एक अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष म्हणून संदीपकुमार कैलाश जाधव यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपने या निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले असून दिवंगत जगन्नाथ कुंभार यांना श्रद्धांजली म्हणुन निवडणुकीतून माघार घेत असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम यांनी स्पष्ट केले आहे. दाखल अर्जाची उद्या दि 10 रोजी छाननी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)