फलटणमध्ये खासगी सावकारीच्या कारणावरुन एकावर गोळीबार?


फलटण, ता. २९ः बरड ता फलटण येथील गोट्या उर्फ गुलाब भंडलकर याच्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली.

या गोळीबारात जखमी झालेल्या गोट्या भंडलकर याला फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती खालावत चालल्याने त्याला अधिक उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोट्या उर्फ गुलाब भंडलकर यास फलटण तालुक्यातील बरड गुणवरे मार्गावर सहा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञातांनी गोळी झाडली. यामध्ये भंडलकर हा गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान हा गोळीबार जुन्या वादातून तसेच खासगी सावकारीच्या कारणावरुन झाल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)