फलटणमध्ये एकास लाकडी दांडक्‍याने मारहाण

फलटण  – शिवाजीनगर येथे एका दोनजणांनी मोटरसायकल आडवी मारून लाकडी दांडक्‍याने गंभीर जखमी केले. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, दि. 31 रोजी दुपारी 3 च्या सुमारास शिवाजीनगर फलटण येथे मुकबधीर शाळेच्या कंपाउंडजवळ दोनजणांनी स्वप्निल गांधी यांची मोटार सायकल अडवून त्याला काही एक कारण नसताना हातातील लाकडी व कळकाच्या दाडयाने डोक्‍यात, कानावर, छातीवर, हातावर जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.

यावेळी त्याचे हातातील सोन्याची अंगठी झटापटीत गहाळ झाली. याबाबत जवाहर प्रेमचंद गांधी यांनी शहर पोलीस ठाणेत फिर्याद दिली असून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)