फलटणमध्ये आरक्षणाचे स्वागत

फलटण, दि. 29 (प्रतिनिधी) – राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिल्याने संपूर्ण फलटण तालुक्‍यातील मराठा समाजाने आरक्षणाचे स्वागत केले. आरक्षणासंबंधी कोणतीही आतषबाजी, आनंदोत्सव साजरा न करता हे आरक्षण आंदोलनाचे यश कोपर्डीच्या भगिनीला व या आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या मराठा तरुणांना अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान शहीद झालेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला दिलेले 16 टक्के आरक्षण उच्च न्यायालयात अडकले होते. त्यावर मागासवर्ग आयोगाच्या अहवालाद्वारे योग्य मार्ग काढून विद्यमान भाजपा सेना शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग नव्याने तयार करून मराठा समाजाला आरक्षण देवून न्याय दिला. यामुळे सरकार व आरक्षणास पाठींबा देणाऱ्या सर्व राजकिय पक्षांचे यावेळी आभार मानण्यात आले.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील प्रमुख शिफारशी आणि त्यावर सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती देणारा कृती अहवाल विधानसभेत मांडल्यानंतर सर्वानुमते मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर तालुक्‍यातील मराठा समाजाने या सरकारकडे केलेल्या मागणीची पूर्तता झाल्याने समाजात व समाजातील युवकांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. मराठा समाजातील तरुणांना शिक्षण व नोकरीत पुढे जाण्याचा मार्ग खुला झाल्याने तरुणांनी या निर्णयाचे उत्साहात स्वागत केले. आरक्षणासाठी उभारण्यात आलेले आंदोलन व अन्य मार्गाने झालेल्या प्रयत्नात ज्ञात, अज्ञात व राजकीय पक्षातील लोकांनी मदत केल्याबद्दल फलटण क्रांती मोर्चाच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
दरम्यान, शहर व तालुका भाजपच्या वतीने फटाक्‍यांची आतषबाजी करून आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत केले. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)