फलटणमध्ये आज 9 कोटींच्या विकासकामांची उदघाटने

ना. रामराजे नाईक-निंबाळकर व मान्यवरांची उपस्थिती

फलटण, दि. 21 (प्रतिनिधी) – फलटण नगर परिषद कार्यालयातील रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर सभागृहाचे उद्घाटन तसेच शहरातील विविध विकासकामांची उद्‌घाटने, भूमीपूजने दि. 22 रोजी सायंकाळी 5 वाजता विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. अध्यक्षस्थानी आ. दिपक चव्हाण राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. नीत नेवसे यांनी दिली.
समारंभास फलटण बाजार समिती सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती ऍड. सौ. मधुबाला भोसले, आरोग्य समिती सभापती अजय माळवे, शिक्षण सभापती असिफ मेटकरी, पाणी पुरवठा सभापती सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुवर्णा अमरसिंह खानविलकर, उपसभापती सौ. प्रगती कापसे, विरोधी पक्षनेते समशेरसिंह हिंदूराव नाईक-निंबाळकर, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, नगर अभियंता पंढरीनाथ साठे, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
विशेष रस्ता अनुदान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधारणा विशेष रस्ता अनुदान, नगरोत्थान, दलितेतर, स्थानिक विकास निधी (आमदार फंड), 14 वा वित्त आयोग, प्राथमिक सुविधा विशेष अनुदान, नगर परिषद निधी अंतर्गत सुमारे 9 कोटींच्या 94 कामांचे भूमीपूजन व उद्‌घाटन करण्यात येणार आहे.
शासनाच्या विविध योजना, स्थानिक विकास निधी आणि नगरपालिका फंडातून हाती घेण्यात येत असलेल्या या विकास कामांद्वारे शहरामधील विविध सोई-सुविधांमध्ये भर घालण्यात येत आहे. प्रामुख्याने विविध भागात रस्ते तयार करणे, खुल्या जागेस संरक्षण भिंत बांधणे, रस्ते सिमेंट कॉंक्रीटीकरण, वाचनालय इमारत बांधणे, शहरातील वाढती वाहतूक व वाहनांची संख्या विचारात घेवून अपघातांचे प्रमाण कमी करणेसाठी रिंगरोड ते डी.एड कॉलेज आणि बारामती रोड ते पंढरपूर रोड या रस्त्यावर रस्ता दुभाजक बांधून त्यामध्ये एलईडी फिक्‍चर्स बसविणे यासह 94 कामे हाती घेण्यात येत असल्याचे नगराध्यक्षा सौ. निता नेवसे यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर नगर परिषद कार्यालयातील श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर सभागृहाचे उद्‌घाटन ना. रामराजे व मान्यवरांच्या उपस्थितीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)