फलटणमधील विविध विकासकामांना सुरूवात

कोळकी – स्वच्छ सर्वेक्षण आभियान अंतर्गत फलटण नगर परिषदेने जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी काळात फलटण शहराचा कायापलट करण्यासाठी नगर परिषद कटीबध्द असून शहरवासीयांनी या स्वच्छता आभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन आरोग्य सामितीच्या सभापती वैशालीताई सुधीर अहिवळे यांनी केले आहे.

स्वच्छ भारत अभियान 2019 अंतर्गत फलटण नगर परिषद फलटणला प्रथम क्रमांक मिळावा यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मार्केट कमिटीचे चेअरमन श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विविध विकास कामांना सुरूवात झाली आहे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण नगर परिषद फलटणच्या वतीने दलितवस्ती सुधारणा अंतर्गत प्रभाग क्र. दोन मधील विविध विकास कामांचे उद्‌घाटन नगरसेविका तथा ओराग्य सभापती वैशालीताई सुधीर अहिवळे यांच्या हस्ते झाला. आरोग्य सभापती वैशालीताई सुधीर अहिवळे यांच्या नियोजनाखाली प्रभाग 2 मध्ये दलित वस्ती सुधारणा अंतर्गत विविध विकास कामांचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी जे. एस.काकडे, लक्ष्मण अहिवळे, दिपक काकडे, प्रशांत काकडे, गौतम काकडे तसेच प्रभाग क्र. दोन मधील नागरिक व इतर मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)