फलटणच्या श्रीराम रथोत्सवास उत्साहात प्रारंभ

दि. 8 रोजी यात्रेचा मुख्य दिवस

फलटण, दि. 4 (प्रतिनिधी) – येथील ग्रामदैवत श्रीराम रथोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे दि. 3 ते 8 डिसेंबर दरम्यान पारंपारिक पध्दतीने साजरा होणार असून शनिवार दि. 8 हा या रथोत्सवातील मुख्य दिवस आहे. या रथोत्सवाव्या नियोजनासाठी नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट आणि फलटण नगर परिषद यांच्यावतीने जय्यत तयारी सुरू झाली आहे.
या सोहळ्यास आज दि. 3 डिसेंबर रोजी परंपरागत पध्दतीने सुरुवात झाली आहे. सलग 5 दिवस दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत मंदिर परिसरात प्रभावळ, अंबारी, शेष, गरुड आणि मारुती ही पाच वाहने परंपरागत पध्दतीने काढण्यात येणार आहेत. या सोहळ्यास दररोज भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. प्रतीवर्षाप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेपासून तुलसी रामायणावर कु. किरण कुलकर्णी, पुणे यांची किर्तने सुरु झाली असून रामरथ यात्रेच्या दिवशी या किर्तनाचा समारोप प्रभू श्रीराम जन्मोत्सवाने होणार आहे.
शुक्रवार, दि. 7 रोजी सकाळी 9 वाजता प्रभू श्रीरामाचे रथास 11 ब्राह्मणाद्वारे लघुरुद्राभिषेक होणार आहे. दुपारी 2 नंतर रथ सजावटीस म्हणजे रथाच्या पोषाखास मानकऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे. शनिवार दि. 8 रोजी सकाळी 7 वाजता कु. कुलकर्णी यांचे किर्तन संपल्यानंतर 8 वाजता प्रभू श्रीरामाची मूर्ती रथामध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर रथ सोहळा परंपरागत मार्गाने शहरातील मिरवणुकीसाठी मार्गस्थ होईल. सायंकाळी 7 वाजता रथसोहळा मंदिरात परत येईल. त्यानंतर बुधवार दि. 12 रोजी श्रींची पाकाळणी सकाळी काकड आरती व नंतर 11 ब्राम्हणांचा लघुरुद्र व महापुजेने यात्रेची सांगता होणार आहे.
रथसोहळ्याच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर रामरथयात्रा भरते. यात्रेसाठी विविध प्रकारची दुकाने, मेवामिठाई व महिलांची आभूषणे तसेच लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानांचा समावेश असतो. तेथे खरेदीसाठी भाविक गर्दी करतात. त्याचप्रमाणे सोहळा शहरातून फिरत असतानाही भाविक दर्शनासाठी या सोहळ्यात सहभागी होतात. यात्रेनिमित्त मोठमोठी खेळण्यांची दुकाने तसेच करमणूकीचे स्टॉल्सही लागतात. यात्रेच्या निमित्ताने यात्रेच्या दुसऱ्यादिवशी फलटण नगर परिषद, नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्ट व अन्य संस्थांच्यावतीने जंगी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)