फलटण : सौ. ज्योती आंबेकर यांना पुरस्कार प्रदान करताना रामराजे नाईक निंबाळकर व इतर.

रामराजे नाईक निंबाळकर यांचे प्रतिपादन
फलटण, दि. 5 (प्रतिनिधी) -फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ गेली चौदा वर्षे उत्कृष्ट कार्य करत असून हे काम राज्यातील पत्रकारांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
येथील “शिवसंदेश’कार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फलटण तालुका पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दीपक चव्हाण होते. व्यासपीठावर श्री सद्‌गुरु संस्था समुहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, पंचायत समिती सभापती सौ. रेश्‍मा भोसले, नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी रामराजे यांच्या हस्ते यावर्षीचा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मुंबई दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका सौ. ज्योती आंबेकर यांना प्रदान करण्यात आला. 25 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप होते.प्रगतशील शेतकरी कै. दशरथराव साळुंखे (पाटील) स्मृती पुणे विभागस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार हरिष पाटणे यांना प्रदान करण्यात आला. 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
माजी नगरसेवक, उद्योजक कै. सुभाषराव निंबाळकर स्मृती जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते खटाव येथील अविनाश कदम यांना प्रदान करण्यात आला. 5 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. वैकुंठवासी ह.भ.प. राजाराम जिजाबा झांबरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक पुरस्कार आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील टी. व्ही. कलाकार व चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक आणि निर्माते धोंडीबा कारंडे यांना प्रदान करण्यात आला. 5 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
रामराजे म्हणाले, राजकारण व पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे की आपल्या वागण्याचे प्रतिबिंब समाजावर लगेच उमटत असते. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींनी वागताना जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे आहे. सामाजिक समतोल बिघडत चालला आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या मदतीवर पत्रकारांनी फार काळ अवलंबून राहू नये. आपल्या लेखणीच्या जोरावर व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपली छाप उमटवावी.
यावेळी एन.एस.एस.चे प्रा. पवार, प्रा. पाडवी, प्रा. कांबळे, प्रा. शिंदे, हरिदास सोनवले पाटील, राजेंद्र खरात, विकास सोनवलकर, सुभाष सोनवलकर, रविंद्र डावेर यांच्यासह एन.एस.एस.चे विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते. रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ विरकर, तालुकाध्यक्ष प्रा.संतोष सोनवलकर, संतोष ठोंबरे, मोहनराव डांगे, डॉ.संतोष सोनवलकर, प्रा.रविंद्र कोकरे यांची उपस्थिती होती. यावेळी नवनाथ कोलवडकर यांचा तुफान विनोदी कार्यक्रम झाला. त्यांनी यावेळी सर्व प्रेक्षकांना खळखळून हसवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलेश सोनवलकर यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत सोनवलकर व नवनाथ कोलवडकर यांनी केले. आभार श्रीरंग पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)