फर्निचरच्या दीर्घायुषीसाठी… (भाग-२)

घरासाठी नवे फर्निचर बनवून घेताना लाकूड तपासून घ्यावे. त्यासाठी बाजारात लहान मॉश्‍चरायझर मीटर उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने लाकडातील दमटपणा ओळखता येतो. हा दमटपणा 8 ते 12 टक्के असला पाहिजे. लाकडामध्ये खूप जास्त ओलसरपणा असेल तर फर्निचर लवकर खराब होते. तयार फर्निचर घ्यायचे असेल तर ते ब्रांडेड घेण्याचा प्रयत्न करावा.

फर्निचरच्य दीर्घायुषीसाठी… (भाग-१)

घरीच तयार करा पॉलिश 
पॉलिश केवळ फर्निचरला चमक देण्याच्या उद्देशाने केले जात नाही तर फर्निचरचा बचाव करण्यासाठीही मदत केली जाते. त्यासाठी अनेक लोक बाजारातील वॅक्‍स पॉलिशचा वापर करतात. पण दीर्घकाळानंतर या पॉलिशच्या वापराने फर्निचर खराब होते. त्यासाठी व्हिनेगर आणि ऑलिव्ह तेल यांचा वापर करु शकता. एका पातेल्यात एक भाग व्हिनेगर आणि तीन चतुर्थांश भाग ऑलिव्ह तेल मिसळून घ्या. सुती कापड घेऊन हे पॉलिश फर्निचरवर लावावे. फर्निचर जुनाट वाटू लागते तेव्हा या पॉलिशचा वापर करावा. व्हिनेगर अँटी फंगल, अँटी मायक्रोबिल असते त्यामुळे फर्निचरला कीड लागण्यापासून बचाव करतात. यासाठी कडुनिंबाच्या तेलाचा वापरही करू शकतो.

वातावरणाचा परिणाम
फर्निचर किती काळ सुरक्षित राहू शकते हे त्याच्या कोटिंग वर अवलंबून असते. त्यासाठी वातावरण पाहून कोटिंग ची निवड करा. घराच्या आत असणाऱ्या फर्निचरला इंटिरियो कोटिंग केली जाते. त्याला ऑईल फिनिश असे म्हणतात. हलक्‍या दमटपणापासून बचाव करतात आणि फर्निचरला चमक देतात. असे फर्निचर खिडकीपाशी ठेवू नये कारण ते लवकर खराब होण्याचा धोका असतो. मोकळ्या वातावरणात बाहेर फर्निचर ठेवणार असाल तर त्यावर एक्‍स्टिरिअर सारखे कोटिंग करून घ्यावे. लाकडाच्या आत लिगनिंन नावाचा घटक असतो तो उन्हाने काळा पडतो. त्यामुळे बाहेर ठेवले जाणारे फर्निचरवर युव्ही रेजिस्टंट पॉलियुरेथिन पॉलिश चा थर दिला जातो. या पॉलिशमध्ये नॅनो झिंक ऑक्‍साईड चा वापर केला जातो.

दरवाजा
पाण्याच्या मारापासून वाचवण्यासाठी बाथरूम च्या दरवाजाला टिन किंव्‌ा ऍल्युमिनिअम चे शीट लावतात. पण तरीही दरवाजा खराब होतो असा अऩुभव आहे. कोणतेही लाकडी गोष्ट समतल पातळीवरील पाणी शोषून घेत नाही. आपल्या कडांमध्ये ती पाणी शोषते. दरवाजे नेहमीच खालून किंवा वरून खालच्या दिशेने कुजायला सुरुवात होते. त्यासापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक दोन वर्षांनी एरलाईडट सोल्यूशन कडांना लावावे.

– स्वाती देसाई


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)