फर्निचरच्य दीर्घायुषीसाठी… (भाग-१)

घरासाठी नवे फर्निचर बनवून घेताना लाकूड तपासून घ्यावे. त्यासाठी बाजारात लहान मॉश्‍चरायझर मीटर उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने लाकडातील दमटपणा ओळखता येतो. हा दमटपणा 8 ते 12 टक्के असला पाहिजे. लाकडामध्ये खूप जास्त ओलसरपणा असेल तर फर्निचर लवकर खराब होते. तयार फर्निचर घ्यायचे असेल तर ते ब्रांडेड घेण्याचा प्रयत्न करावा.

घराचे सौंदर्य फर्निचरवरही अवलंबून असते. घराचे सौंदर्य आणि चमक अधिक चांगली राहण्यासाठी फर्निचरची योग्य देखभाल करणे गरजेचे आहे. या दिवाळीत फर्निचरची घ्या अशी काळजी.

दिवाळी सण मोठा नाही आनंदा तोटा असे म्हणत आपण सारे दिवाळीच्या तयारीला लागतो. घराच्या कोपऱ्या कोपऱ्याची स्वच्छता करतो. घराच्या भिंती रंगवतो, सजावटीचे सामान आणतो. त्यात महत्त्वाचा भाग असतो तो फर्निचरचा. पण फर्निचर काही सतत नवे आणले जाऊ शकत नाही. मात्र आहे ते फर्निचर नीट ठेवले तर ते नव्यासारखे राहाते. त्यासाठी गरज आहे ती फर्निचरचा प्रकार समजून घेणे आणि त्याची काळजी घेणे. तरच फर्निचर चांगले राहाते. त्याव्यतिरिक्त घरात नवे फर्निचर करणार असाल किंवा खरेदी करणार असाल तर फक्त त्याच्या डिझाईनवर लक्ष देणे योग्य नाही. त्याव्यतिरिक्त काही गोष्टी जाणून घेऊन फर्निचर घरी आणले तर ते अनेक वर्ष आपल्याला साथ देते.

स्वच्छतेची योग्य पद्धत 
फर्निचरची स्वच्छता रोजच्या रोज करावी असा नियम केला असेल तर थोडे थांबा कारण रोज पुसल्याने फर्निचरची चमक लवकर कमी होते. फर्निचर आठवड्यातून एकदाच साफ करावे. फर्निचरला योग्य प्रकारे पॉलिश केले असेल तर त्यात धूळ अडकत नाही. अशा वेळी सुती कापडावर थोडे पाणी शिंपडून त्याने स्वच्छता करावी. पॉलिश केले नसेल तर सुक्‍या कापडाने झटकून फर्निचर साफ करावे. पॉलिश न केलेले लाकडी सामान घरात ठेवू नये. कारण त्याला कीड लागू शकते. फर्निचरचाही कोणता भाग पॉलिश केलेला नसेल तर तोदेखील सुक्‍या कपड्याने साफ करावा.

फर्निचरच्य दीर्घायुषीसाठी… (भाग-२)

बचाव गरजेचा

लाकूड निसर्गनिर्मित असते त्यामुळे त्याला कीड लागणारच त्याचबरोबर लाकूड हायड्रोस्कोपिकही असते त्यामुळे लाकडाला पाणी जास्त आवडते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींपासून लाकडाचा बचाव करावा. पाण्यापासून बचाव करण्यासाठी फर्निचरवर कोटिंग किंवा पॉलिश करणे गरजेचे असते. तर किडीपासून बचाव करण्यासाठी प्रिझर्व्हेशन करणे विसरू नये. सर्वात स्वस्त आणि सुलभ उपलब्ध असणारे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणजे बोरेक्‍स बोरिक ऍसिड. ते फर्निचरवर लावू शकता. फर्निचर बनवून घ्या किंवा पॉलिश करून घ्या त्यावर प्रिझरव्हेटीव्ह जरुर लावावे.

– स्वाती देसाई


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)