फर्गसनचे बोटॅनिकल गार्डन होणार अधिक समृध्द

पुणे – जैववैविध्यासाठी देशात प्रसिध्द असणारे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बोटॅनिकल गार्डन आता अधिक समृध्द होणार आहे. तीन वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात या उद्यानात २५० दुर्मीळ वृक्षांची नोंद होती. महाविद्यालयात झालेल्या वृक्षारोपण कार्यकमात विविधप्रकारची १०८ दुर्मीळ झाडे लावण्यात आली. त्यामुळे जैववैविध्यतेत आधीच संपन्न असणारे हे उद्यान अधिक समृध्द होणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट सायन्सपाठोपाठ जैववैविध्यात फर्गसनच्या बोटॅनिकल गार्डनचा देशात दुसरा कमांक लागतो. १९०२ मध्ये या उद्यानाची निर्मिती केली. वि. दी. वर्तक यांनी या उद्यानाचा अभ्यास केला. तेव्हा दुर्मीळ ४३७ झाउांची नोंद केली. १९६१ च्या पानशेत पुरात बरीच दुर्मीळ झाडे नामशेष झाली. २००९ ते २०१४ या कालावधीत महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभ्यास करून महाविद्यालयात ५३४ झाडांची आणि बोटॅनिकल गार्डनमध्ये २५० झाडांची नोंद केली. याबाबतचा प्रबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित केला.
वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख सुनंदा काटे, पर्यवरणशास्त्र विभाग प्रमुख रुपाली गायकवाड, डॉ. मीनाक्षी महाजन, अक्षय ओमकार,प्राची पांडे यांनी वृक्षारोपणाच्या कार्यकमाचे संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)