फरार कैदी दहा वर्षांनी जेरबंद

पुसेगाव, दि. 15 (वार्ताहर) – गंभीर गुन्ह्यात पुणे येथील येरवडा तुरूंगात 14 वर्षाची झालेली शिक्षा भोगत असलेल्या व पॅरोलवर सुट्टीला आल्यापासून 10 वर्षापूर्वी फरार असलेल्या कैद्यास पकडण्यात पुसेगाव पोलीसांना यश आले आहे.
खातगुण ता. खटाव येथील रामदास भानुदास पवार (वय 35)हा पुणे येथील येरवडा तुरूंगात गंभीर गुन्हयाची शिक्षा भोगत होता. त्याची 7 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर त्याला संचित रजेवर 2009 मध्ये घरी सुट्टीसाठी सोडले होते.

15 दिवसांची रजा संपल्यानंतर त्याने पुन्हा तुुरूंगात हजर राहणे आवश्यक असताना तो फरार झाला होता.त्यावेळी येरवडा तुरूंग पोलीस योगेश हणमंत सणस यांनी त्याबाबत पुसेगाव पोलीसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेव्हापासून त्याचा तपास सुरू होता. जिल्हा पोलीसप्रमुख पंकज देशमुख यांनी फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी सध्या विशेष मोहिम सुरू केली. त्यानुसार पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना सुचना देण्यात आल्या होत्या.

पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन माने यांनी गेल्या काही दिवसांपासून गुप्त माहिती काढण्यास सुरूवात केली त्यानुसार रामदास पवार 10 वर्षापासून वेषांतर करून पुसेगाव परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. सपोनि विश्वजित घोडके, सचिन माने, सुधाकर भोसले, सचिन जगताप यांच्या पथकाने सापळा रचून त्यास खटाव येथून ताब्यात घेतला.

शिक्षेत पाचपट वाढ होणार
रामदास पवार याला एकूण 14 वर्षाची शिक्षा झाली होती.पॅरोलवर असताना फरार झाल्याने त्याच्या शिक्षेत पाचपट वाढ होणार असल्याने आता त्याचे उर्वरीत आयुष्य तुरूंगातच जाण्याची शक्यता पोलीस सुत्रांकडून व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)