‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८’ च्या अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्याचा फटका देशाला चांगलाच बसला आहे. यातील मुख्य आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनी मिळून देशातील बँकांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. या पूर्वी उद्योगपती विजय मल्ल्या यांनीदेखील देशाचे कोट्यवधीचे कर्ज बुडवले आहे. दरम्यान, अशा फरार लोकाच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी केंद्र सरकारने काल ‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८’ चा अध्यादेश जारी केला होता. याच अध्यादेशावर आता राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  ‘फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८’ या आर्थिक अध्यादेशाला सुद्धा मंजुरी दिली आहे. बलात्काराच्या घटनेआधी देशात बँक घोटाळा उघडकीस आला होता. बँकेचे हजारो कोटी रुपये घेऊन विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखे लोक देश सोडून पळून गेले आहेत. कर्ज घेतल्यानंतर जे परदेशात पळून जातात आणि देशात परतण्यास नकार देतात अशा गुन्हेगारांना, अटक वॉरंट काढण्यात आले असेल अशा गुन्हेगारांना, तसेच ज्यांनी १०० कोटी रुपयांहून अधिक कर्जासाठी ज्यांचे नाव डिफॉल्टर्स यादीत नमूद असेल अशा गुन्हेगारांना या विधेयकातील तरतुदी लागू होणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)