फरारी गुन्हेगारास शिताफीने अटक

कोरेगाव – मारामारीच्या गुन्ह्यात बरेच दिवस फरारी असलेला गुन्हेगार तानाजी रामचंद्र पवार रा. फाळके चाळ, सातारारोड, तालुका कोरेगाव याला सातारा रोड दूरक्षेत्रातील पोलिसांनी शिताफीने अटक केली.

सातारारोड फाळके चाळ येथे राहणारा तानाजी पवार यांच्यावर कोरेगाव कोर्टात 104/13 प्रमाणे गुन्हा दाखल होता. आरोपी तानाजी पवार कोर्टाच्या तारखांना कायम गैरहजर राहात असल्याने कोरेगाव कोर्टाने त्यावर पकड वॉरंट काढले होते. दिनांक 2 सप्टेंबर रोजी तानाजी पवार हा सातारा रोड येथे येणार असल्याची खबर सातारा रोड दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंखे यांना मिळाली.

त्याप्रमाणे पोलीस हवालदार सनी आवटे, पो. ना. सपकाळ, पो. कॉ. कदम यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता कोर्टाने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तानाजी पवार याला जामिन न देता सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)