फरहान-शिबानी दांडेकर लवकरच विवाहबद्ध होणार

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर हे दोघेही या वर्षात विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या अफेअरची चर्चा आत बॉलिवूडमध्ये रंगायला लागली आहे. ही जोडी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे वारंवार चर्चेत आहे. अनेकदा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिबानी आणि फरहान एकेकांमसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात, या दोघांच्या नात्याची चर्चा तेव्हापासून सुरू आहे. ते दोघेही नुकतेच एका रिसेप्शन पार्टीतही एकत्र दिसल्यामुळे या दोघांच्या नात्यांवर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले.

काही दिवसांपूर्वी शिबानी दांडेकरच्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्टवर पाठमोरा फरहान तिच्या हातात हात घालून फिरताना दिसला होता. तेंव्हा तिच्याबरोबरचा हा हिरो कोण अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र थोड्याच दिवसात याचा उलगडा झाला होता. आता या नात्याला फरहानच्या मुलांनीदेखील हिरवा कंदील दिला असल्याचे समजत आहे. शिबानी नुकतीच फरहानची मुले आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसली. या नात्याबद्दल फरहान आणि शिबानी खूपच गंभीर आहेत. तसेच फरहानच्या मुलांनादेखील शिबानीची सोबत आवडली असल्यामुळे ते दोघेही नक्कीच पुढचा विचार करतील, असेही त्यांच्या जवळची व्यक्ती एका मुलाखतीत म्हणाली. त्यामुळे 2019 मध्ये ते दोघेही विवाहबंधनात अडकतील अशा चर्चा आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)