फरहान अख्तर करतोय शिबानी दांडेकरसोबत डेट

अधुनासोबत फरहान अख्तरने तलाक घेतल्यानंतर श्रद्धा कपूरसोबत त्याचे डेटिंग सुरू असल्याची चर्चा होती. दरम्यान, या दोघांमध्ये चांगलीच मैत्रीचे संबंध निर्माण होईल असे वाटत असतानाच आता फरहानच्या जीवनात दुसरी एक मुलगी आली आहे.

सध्या फरहान आणि श्रद्धा हे दोघे एकमेकांपासून विभक्‍त झाले आहेत. त्यानंतर फरहान 37 वर्षीय अभिनेत्री आणि गायिका शिबानी दांडेकर हिच्यासोबत डेट करत असल्याचे समजते. फरहान आणि शिबानी हे दोघे 2015पासून एकमेकांना ओळखतात. त्यावेळी शिवानीने एका शोमध्ये भाग घेतला होता, ज्यात फरहान हा होस्ट म्हणून उपस्थित होता. याबाबत जेव्हा शिवानीला विचारण्यात आले तेव्हा तिने चुप्पी साधली आणि याची मला काही कल्पनाच नाही, असे सांगितले.

-Ads-

दुसरीकडे फरहानकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणतेही उत्तर देण्याचे टाळले.
दरम्यान, फरहान हा त्याच्या आगामी “द स्काई इज पिंक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय प्रियांका चोप्रा आणि जायरा वसीम हे मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोनाली बोस करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)