फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे “गुफ्तगू’

काही दिवसांपूर्वी शिबानी दांडेकरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिच्याबरोबर एक तरुण पाठमोरा होता. त्यामुळे शिबानीबरोबर नक्की कोण होता याची चर्चा सुरू झाली. हा फोटो मूळचा कोठून आला, याचा शोध घेतला असता, तो फरहान अख्तरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल झाल्याचे समजले. त्यातूनच अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्यात सध्या “गुफ्तगू’ सुरू आहे, ही बाब उघड झाली.

गेल्या काही दिवसांपासून फरहान आणि शिबानी दांडेकरच्या संबंधाबाबत जोरदार चर्चा होती. फरहाननेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो स्वतः आणि शिबानी दोघे हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्याने हार्टचा सिम्बोल टाकलेला आहे. यावरूनच शिबानी आणि फरहान नात्यात असल्याचे कळत आहे. फरहानने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा फोटो शिबानीने महिन्याभरापूर्वी तिच्या इन्टाग्रामवर शेअर केला होता. तेव्हापासूनच यांच्या नात्याची चर्चा रंगली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2015 पासून फरहान आणि शिबानी एकमेकांना ओळखतात. फरहान जो शो होस्ट करत होता. शिबानीही त्या शोचा भाग होती. पुढे त्यांची मैत्री झाली आणि आता हे नाते मैत्रीपेक्षा बरेच पुढे गेले. आता दोघांचेही एकमेकांशिवाय पान हलत नाही. फरहान हा घटस्फोटित असून दोन मुलांचा बाप आहे.

फरहान हा अभिनेता असण्यासोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आहे. शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात अमेरिकन टेलिव्हीजनमध्ये टीव्ही अँकरच्या रूपात केली होती. ती नेहमीच विविध फोटोशूटमुळे चर्चेत असते. तिने आयपीएलचे अनेक सिझन होस्ट केले आहेत. तसेच ती शाहरुख सोबत एका जाहिरातमध्येही झळकली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)