फरहानने ‘फेसबुक’ला केला बाय-बाय

फेसबुकवरील डेटा लीक प्रकरणानंतर अभिनेता फरहान अख्तरने या सोशल नेटव्हर्किंग साइटवरील आपले फेसबुक अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. नुकतेच त्याने ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली आहे.

मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, मी माझे फेसबुक अकाऊंट डिलीट केले आहे. मात्र, माझे अधिकृत फॅन पेज फेसबुकवर सुरु आहे, असे ट्विट त्याने केले आहे. सध्या फेसबुक वादात अडकले आहे. परंतु,फरहानने मात्र फेसबुक डिलीड करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट केले नाही. यामुळे त्याने हा निर्णय का घेतला असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. फरहानपूर्वी स्पेस एक्‍सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क, हॉलिवूड अभिनेता जिम कॅरी यांनीही त्यांचे फेसबुक अकाऊंट डिलीट केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)