फडतरे नॉलेज सिटीच्यावतीने रणवरेचा सन्मान

कुरवली- शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करून समाजाचा कणा होणाऱ्या अधिकारी व खेळाडूचा सन्मान कळंब येथील फडतरे नॉलेज सिटीच्या वतीने नुकताच करण्यात येतो. यंदा स्पर्धा परीक्षेत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या प्रशांत रणवरे यांचा सन्मान संस्थापक उत्तम फडतरे यांच्या हस्ते तैलचित्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. जीवनात यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम सोबत सातत्य असणे आवश्‍यक असून गुरुजनाचे मार्गदर्शन व योग्य संगत आयुष्यला खरा अर्थ प्राप्त करून देतात. 2014मध्ये स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान फडतरे नॉलेज सिटीच्या वतीने करण्यात आला होता, तेव्हापासून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश संपादन केले असल्याचे तसेच घरातून देशसेवेचा वारसा मिळाल्याचे प्रशांत णवरे यांनी सांगितले. याप्रसंगी प्राचार्य संदीप पानसरे, के. बी. गवळी, अतुल बोंद्रे, अनिता भाटीया, निलम डोंबाळे, सारीका पानसरे, समीर पठाण, रज्जाक आतार, नितीन सोरटे, अमोल कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)