फडणवीस सरकारची डेडलाईन शिवसैनिक ठरवतील

आदित्य ठाकरे यांची सरकारवर टीका
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतर आता राज्यातील सरकारच्या युतीविषयी सध्या दोन्ही पक्षांकडून तोडण्याचे संकेत देण्यात येत आहेत. त्यातही शिवसेना अग्रस्थानी आहे. त्यातच राज्यातील फडणवीस सरकारच्या नोटीस पीरियडची डेडलाईन शिवसैनिकच ठरवणार असल्याचे वक्तव्य युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी केले आहे. काल मुंबईत सेनेची रॅली पार पडली. त्यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
फक्त मंत्रीपद मिळाले म्हणून काही जणांना मुंबई माहिती झाली आहे. नाहीतर अनेकांना मुंबई माहिती तरी होती का?, असा सवाल विचारत आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. शिवाय, निवडणूक लढवायला मी कधीच नकार दिला नाही. जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर याचा विचार होणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरेंआधी काल अमरावतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली होती. देवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. मात्र, शिवसेना-भाजपमधील स्थिती थोडी वेगळी आहे. राज्य सरकारमध्ये एकत्र नांदत असलेले हे दोन्ही पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांचे शत्रू असल्याच्या आवेषानेच वागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये कोणता पक्ष सरस ठरणार हे येत्या 23 तारखेलाच समजणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)