फडणवीस, भिडे यांच्या वक्‍तव्याचा निषेध

पिंपरी – संभाजी भिडे यांनी अंधश्रध्दा पसरवणारे केलेले वक्तव्य तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या बद्दल काढलेल्या अपशब्दाचा सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग परचंडराव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे निषेध केला आहे.

परचंडराव यांनी म्हटले आहे की, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यामुळे मुले होतात असे विधान करून महिलांचा अपमान आणि एकूणच समाज संस्कृतीवर अंधश्रद्धेचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. भिडे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते असे हिंदु संस्कृतीच्या नावाने समाज विघातक वक्तव्य करत आहे. भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणी भिडेंवर गुन्हे दाखल झाले असून त्यांना हे सरकार अटक न करता पाठीशी घालत आहे. ही या लोकशाहीची थट्टा आहे. भिडेंसारखी प्रवृत्ती लोकांमध्ये मतभेद निर्माण करून त्याला धर्माची जोड देऊन इतर धर्मियांविरूद्ध कटकारस्थान रचत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोबाईल ट्विट करून अपशब्द वापरले आहेत. राज्यामध्ये हल्लाबोल कार्यक्रम संपल्यांनतर पवार यांनी छगन भुबळ यांना महात्मा फुल्यांची पगडी घातली याचा त्यांना राग आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या बद्दल अपशब्द काढले असून मुख्यमंत्री आणि भिडे यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)