फडकेवस्ती शाळेत सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

चिंबळी- नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती निमित्त फडकेवस्ती (निघोजे ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी दिली. थोर सेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी निघोजे गावचे पोलीस पाटील राहुल फडके हे होते. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा’ अशी घोषणा करुन इंग्रजांविरुद्ध युद्ध लढणारा, पहिली भारतीय सेना उभी करणारा, पहिले हिंद सरकार स्थापन करणारा हा महान योद्धा होता, अशी माहिती वक्‍त्यांनी दिली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रुपाली फडके, उपाध्यक्ष राजेश येळवंडे, नाना फडके, रामभाऊ फडके, दिलीप फडके, सीताबाई गेंगजे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)