फडकेवस्ती शाळेत राजमाता जिजाऊंना अभिवादन

चिंबळी- हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणा स्थान जिजाऊ माता व युवकांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती फडकेवस्ती (निघोजे, ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहात साजरी झाल्याचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी सांगितले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात जिजाऊ व विवेकानंद यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभे करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या सर्व जीवनचरित्र अत्यंत प्रेरणा दायी असल्याचे सांगितले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज त्यांनी घडविले. त्याचबरोबर भारतीय तत्त्वज्ञान सर्व जगात प्रसार करणारे विवेकानंद यांचे कार्यही युवकांना प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रुपाली फडके, उपाध्यक्ष राजेश येळवंडे, सदस्य नाना फडके, बाळासाहेब फडके, सीताबाई गेंगजे, गुलाब वाळुंज आदी मान्यवर उपस्थितीत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)