फडकेवस्ती शाळेत एकतेची शपथ

चिंबळी- भारताचे लोहपुरुष, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व जागतिक एकात्मता दिन फडकेवस्ती (निघोजे, ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळात उत्साहात साजरा झाल्याचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी सांगितले. स्वातंत्र्य भारताचे पहिले उपप्रंतप्रधान, पहिले गृहमंत्री, भारतरत्न, स्वातंत्र सेनानी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी विद्यार्थी व शिक्षकांनी एकात्मता दिंडी काढून सरदार पटेलांना मानवंदना दिली. सरदार वल्लभभाई पटेलांमुळेच वेगवेगळ्या संस्थानांचे एकत्रीकरण देशात होऊन देश एकसंघ निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यानंतर सर्वांना एकतेची शपथ देण्यात आली. याप्रसंगी शाळा समितीचे उपाध्यक्ष राजू येळवंडे, नाना फडके, मुख्याध्यापक अरुण गायकवाड, सीता गेंगजे, दिलीप फडके आदी मान्यवर उपस्थितीत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)