फडकेवस्तीत विद्यार्थ्यांची प्रभाफेरी

चिंबळी- फडकेवस्ती (निघोजे, ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. ध्वजपूजन ग्रामपंचायत सदस्या सुजाता फडके, बाबाजी येळवंडे यांच्या हस्ते केल्यानंतर ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या रुपाली येळवंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर सामाजिक कार्यकर्ते यशवंत फडके यांच्या अध्येक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय कवायत, शाळेचे अहवाल वाचन व विद्यार्थी, ग्रामस्थ भाषणानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाचे औचित्य साधुन पोलीस पाटिल राहुल फडके, ग्रामपंचायत सदस्या सुजाता फडके व जाणता राजा मित्रमंडळ यांच्यावतीने साउंड सिस्टिम व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मोठी सतरंजी तर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने दहा खूर्ची देण्यात आल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक अरुण गायकवाड, रुपाली येळवंडे, शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्षा रुपाली फडके, रामभाऊ फडके, गजानन, फडके, उपाध्यक्ष राजेश येळवंडे, लता फडके, नवनाथ फडके, नाना फडके, मंगल येळवंडे, सीताबाई गेंगजे, बाळासाहेब फडके आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अरुण गायकवाड, तर गजानन फडके यांनी आभार केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)