फटाक्‍यांच्या बाबतीतील आदेशात सुधारणा 

file photo

नवी दिल्ली: दिवाळीच्या काळात केवळ संध्याकाळी आठ ते रात्री दहा वाजण्याच्या अवधीतच फटाके वाजवण्याच्या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने आज काही सुधारणा करीत तामिळनाडु आणि पुदुच्चेरीसाठी ही वेळ सकाळी दोन तासांसाठी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या संबंधात या राज्यांतील सरकारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

आमच्या राज्यातील धार्मिक परंपरेनुसार पहाटे दिवाळी निमीत्त विविध कार्यक्रम होत असतात त्यामुळे आमच्या राज्यात पहाटे फटाके उडवण्यास अनुमती मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती. न्यायालयाने ती मान्य करीत त्यांना तशी अनुमती दिली आहे पण त्यांनी कालावधीत मात्र फरक केलेला नाही किंवा तो वाढवूनही दिलेला नाही असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. पर्यावरण पुरक फटाक्‍यांची अट यावेळी तरी पुर्ण करता येणे शक्‍य नाही कारण त्याच्या उत्पादनाविषयी निर्बंध घालता येणे या दिवाळीत शक्‍य नाही असेही या सरकारांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)