फटाक्‍यांऐवजी ग्रंथ घ्या, किल्ले बांधा : प्रा सुभाष वाघमारे

ओझर्डे ः विवेक वाहिनीत सहभागी झालेले महाविद्यालयाचे विद्यार्थी -विद्यार्थिनी व प्राध्यापक.

ओझर्डे, दि. 24 (वार्ताहर) – प्रचंड ध्वनिप्रदूषण, व वायुप्रदुषण,अपघाताने भाजणे, आग लागणे, वृध्द व आजारी व्यकतींना त्रास, फटाके कंपनीत बालमजूर यांना होणारा त्रास, आणि फटाके मुळे होणारा अनुत्पादक खर्च हे सारे फटाक्‍यांमुळे घडत असेल तर फटाके वाजवणे आता सुजाण होऊन बंद केले पाहिजे, त्या ऐवजी ललित वैचारिक ग्रंथ घ्या, किल्ले बांधा किंवा वैद्‌ण्यानिक खेळणी घ्या असे आवाहन प्रा सुभाष वाघमारे यांनी केले, ते येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विवेक वाहिनीने आयोजित केलेल्या प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी फटाके विरोधी अभियान पत्रकाच्या प्रसारण कार्यक्रमात बोलत होते, या वेळी कॉंलेज मधील विवेक वाहिनीच्या कार्याध्यक्षा प्रा राणी शिंदे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा गणेश,तारू, प्रा राजेंद्र देशमुख इ उपस्थित होते.
फटाके उडवण्याचा प्रथेबद्दल बोलताना प्रा वाघमारे म्हणाले की दिवाळी हा मूळ फटाक्‍याचा सण नाही, तो दिव्यांचा सण आहे, फटाके वाजवण्याची प्रथा ही चीनची असून तिकडे, पिशाच व भुतेखेते यांना हाकलून लावण्यासाठी फटाके वाजवत असत, तसा त्यांचा समज होता, भारतात आज केवळ दिवाळी दसरयालाच फटाके वाजवतात असे नाही, तर देवदेवतांचे आगमन विसर्जन, लग्न, वाढदिवस, बारशे, नवे वर्ष,क्रिकेट मॅंच जिंकल्यावर, निवडणुकात, अशा कितीतरी वेळा फटाके वाजवतात, स्वत:चे पैसै मोजून विषारी वायुची धुरी घेणे आरोग्यास अपायकारक आहे, फटाके वाजवून चुकीच्या प्रथा तयार करू नयेत, माणूस, पशुपक्षी, सृष्टी सुखी रहावयाची असेल तर फटाकेच्या खर्चात बचत करून सर्जनशील खेळ खेळावेत, अनेक आजारांना आमंत्रण देणारे, बालमजुरीला प्रोत्साहन देणारे, अमाप वृक्षतोड करणारे, करोडो रूपयांचा चुराडा करणारे, फटाके वाजवून दिवाली साजरी करण्यापेक्षा, स्वच्छ, निरोगी, आनंदी वातावरणात, एकमेकांना मिठाई, भेटवस्तू, पुस्तके, खेळणी देत फटाके मुक्त दिवाळी साजरी करणे केंव्हाही आनंददायी आहे, असे मत त्यानी व्यक्त केली, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रतिभा ग्रूप इन्स्टिट्यूटची पत्रके विद्यार्थ्याना देण्यात आली, ज्यात, जयंत नारळीकर, नरेंद्र जाधव, सचिन तेंडुलकर, प्रकाश आमटे व नाना पाटेकर यांनी या बाबत आवाहन केले आहे, यावेळी विवेक वाहिनीत सहभागी विद्यार्थी, महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)