फटाके विरहित दिवाळीची विद्यार्थ्यांची शपथ

पिंपळे-गुरव – दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरात स्काऊट व हरित सेना विभागाच्या फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांनी मैदानावर उभे राहून फटाके न वाजवण्याची सामूहिक शपथही घेतली. शाळेचे प्रथम सत्राची सांगता सहामाही परीक्षेने होताना दिवाळीच्या सुट्ट्या व फटाक्‍यांच्या आतषबाजीचे विद्यार्थीना वेध लागले होते. वीर महाराणा स्काऊट पथकातील विद्यार्थ्यांनी शपथ दिली. स्काऊट शिक्षक मिलिंद संधान यांनी फटाक्‍यांमुळे हवेत पसरणारे दूषित कण व त्यापासून होणारे आजार, कर्कश फटाक्‍यांच्या ध्वनी प्रदुषणामुळे गर्भवती महिला, तान्हुले बाळ, ज्येष्ठ नागरीक व दीर्घ आजाराने पीडित लोकांवर याचा होणारे विपरीत परिणामाची माहिती दिली.
प्राचार्य रामचंद्र गोंटे व जनता शिक्षण संस्थेचे सचिव सुभाष गारगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भोसले, अनिल पाटील, संजय झराड, गंगाधर पवार व दशरथ वालकोळी यांनी कार्यक्रम यशस्वी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)