फटाके वाजवताना अपघातांची संख्या यंदा घटली

ससून रुग्णालय प्रशासनासह शहरातील अन्य डॉक्‍टरांचाही दुजोरा

पुणे – फटाके वाजवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंधन घातल्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजन पडले. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयामुळे दरवर्षी फटाके वाजवताना घडणाऱ्या घटनांची संख्या यावर्षी कमी झाल्याची माहिती ससून रुग्णालय प्रशासनाने दिली. त्याला शहरातील अन्य डॉक्‍टरांनीही दुजोरा दिला आहे.

दिवाळीचा सण आला की, फटाक्‍यांची आतषबाजी सर्वत्र पाहायला मिळते. शहरात दिवसभर फटाक्‍यांचा आवाज येत असतो. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा या दिवशी अभ्यंगस्नान झाल्यावर शहरात फटाक्‍यांच्या आतषवाजीला सुरूवात होते. या आतषबाजीमुळे शहरात फटाक्‍यांचा धूर पसरतो, जसे की धुके पसरल्यासारखे वाटते. मात्र, हा धूर आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोक्‍याची आहे. त्यातच फटाके वाजवताना काळजी न घेतल्यामुळे अनेक घटना घडतात. भाजणे, डोळ्याला इजा होणे, कानाजवळ फटाके फुटल्यामुळे कानाचे पडदे फाटणे यासह अनेक घटना घडतात. एवढ नव्हे, तर फटाक्‍यांमुळे आगीच्या घटनाही घडतात. मात्र, यावर्षी रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके वाजवावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. काही मंडळींनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, कारवाईच्या भीतीपोटी बहुतांश नागरिकांनी आठ ते दहा या वेळेतच फटाके वाजविले. त्यामुळे फटाक्‍यामुळे भाजणे, इजा होणे यासारख्या घटना कमी झाल्याचे दिसून आले.

फटाक्‍यामुळे शारीरिक इजा झाल्यानंतर शहरातील विविध भागातील रुग्ण ससून रूग्णालयात उपचारासाठी येत असतात. त्यानुसार ससून रुग्णालयात 2017 मध्ये फटाक्‍यांमुळे शारीरिक इजा झालेल्या 13 जणांना बाह्यरूग्ण विभागात उपचार देण्यात आले. तर 6 जणांवर आंतररुग्ण विभागात उपचार करण्यात आले. परंतू, यावर्षी 2018 मध्ये केवळ 9 रूग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेऊन गेले तर दोघांना आंतररूग्ण विभागात उपचार देण्यात आले. त्यावरून गतवर्षीपेक्षा 60 टक्के अपघाताचे प्रमाण घटले आहे, असे ससून रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

फटाके वाजविण्यासाठी सर्वोच्च न्यायाल्याने घालून दिलेल्या वेळेमुळे अपघातांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांहून कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यातही हे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येईल. तसेच नागरिकांनीही या आदेशाचे पालन करून, फटाके वाजवताना खबरदारी घ्याची. फटाक्‍यामुळे शरिराला इजा होणार नाही किंवा आगीची घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी. लहान मुलांना फटाक्‍यांपासून दूर ठेवावे.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)