फक्‍त 2 टक्‍के लोकांची शेअरबाजारात गुंतवणूक 

राष्ट्रीय शेअरबाजाराचे काम आगामी काळात आणखी वाढणार-मनमोहन सिंग 
कंपन्यांना भांडवल उभारणीसाठी होत आहे मदत 
नवी दिल्ली: 25 वर्षापूर्वी सुरू झालेला शेअरबाजार (एनएसई) आता जगातील सर्वांत मोठ्या शेअरबाजारापैकी एक आहे. यामुळे भारतातील कंपन्यांना भांडवल उभारणीसाठी मोठी मदत झाली आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. आगामी काळात तर हा शेअरबाजार आणखी वाढणार असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यानी म्हटले आहे. भारतातील एकूण बचतीच्या केवळ 5 टक्‍के रक्‍कम शेअरबाजारात येते. विकसित देशात हे प्रमाण 40
टक्‍क्‍यांपर्यंत आहे.
ते म्हणाले की, मी अर्थमंत्री असताना 1994 मध्ये हा शेअरबाजार सुरू झाला होता. त्यावेळी याच्या उपयोगीबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या होत्या. मात्र, त्या सर्वांच्या शंका आता खोट्या ठरल्या आहेत. या शेअरबाजाराच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, 1991 मध्ये सुरू करण्यात आलेल्या सुधारणामुळे भारताचा विकासदर आता जगातील सर्वात जास्त विकासदरापैकी
एक आहे.
या शेअरबाजाराने भारतीय भांडवल बाजाराचे आधुनिकीकरण केले आहे. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचा शेअरबाजारावरील विश्‍वास वाढला आहे. त्याचबरोबर विविध उद्योगांना मोठ्या प्रमाणात भांडवल मिळाले आहे. आता हा शेअरबाजार भारतातील कंपन्यांना भांडवल पुरविण्याबरोबरच भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या वाढत्या विकासदराचे हा शेअरबाजार प्रतीक बनला आहे. भारतातील लोकांची शेअरबाजारातील गुंतवणूक वाढली आहे. एकूणच भारतीयांची अर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी या शेअरबाजारांचा उपयोग झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले भारतीय शेअरबाजार आगामी काळात अमर्याद वाढणार आहेत. सध्या डि मॅट खात्याची सुविधा असूनही देशातील फक्‍त 2 टक्‍के लोक शेअरबाजारात गुंतवणूक करीत आहेत.
विकसित देशात अशा गुंतवणूकदारांचे प्रमाण तब्बल 40 टक्‍क्‍यापर्यंत असते. त्यामुळे भारतीय शेअरबाजार वाढण्यास अमर्याद म्हणता येतील इतक्‍या संधी असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शेअरबाजाराने जास्तीत जास्त रिटेल गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक वाढत असल्याबद्दल त्यानी समाधान व्यक्त केले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)