फक्त 30 मिनिटे चालण्याचे हे आहेत अनेक फायदे…

चालणे हे आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. तुम्ही नियमित केवळ अर्धा तास चालला तर याचे तुम्हाला एक नव्हे, दोन नव्हे तर अनेक फायदे होतात. जाणून घ्या, कोणते ते…

सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्‍सिजनचा शरीराला पुरवठा होतो

हाडांच्या मजबुतीसाठी आवश्‍यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळ्च्या कोवळ्या उनातून मिळते

चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो

सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो

चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते

चालण्यामुळे झोपही चांगली लागते

मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते

वजन कमी करण्यास मदत होते

चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात

चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते

दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे

चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात

फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते, पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते

चयापचय संस्था सुधारते. अंतस्रवी ग्रंथीचे कार्य सुधारते

नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग

नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. विशेष म्हणजे, हा व्यायाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कसलीही अट नाही. कोणीही हा व्यायाम करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)