फक्त चहापाण्यावर 60 वर्षे जिवंत राहिलेली सरस्वतीबाई

एक दिवस उपवास करायचा म्हटले, तर आपला जीव भुकेने व्याकुळ होतो. दुपार होता होता पोटात कावळे ओरडू लागतात. मग आपण काहीतरी फराळाचे पदार्थ खातो. काही कारणाने एक दोन दिवस जेवायला मिळाले नाही, तर अंगात उत्साह राहत नाही , काही काम करावेसे वाटत नाही. एक दोन दिवसात आपली अशी व्याकुळ अवस्था होते. पण धामनोदचे सरस्वतीबाई म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच आहे. तिने एक दोन दिवसच नाही, तर गेल्या साठ वर्षांत अन्नाचा कणही खाल्लेला नाही. या काळात फक्त चहा आणि पाणी एवढाच तिचा आहार आहे. कधीतरी, आठवड्यातून एखादे वेळी ती एक केळे खाते.

आज 75 वर्षांची असलेल्या सरस्वतीबाईला पाच मुले आहेत. गेल्या साठ वर्षांत तिने अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. फक्त चहा आणि पाणी यावरच ती जिवंत आहे. मात्र काही खात नसली, तरी सरस्वतीबाई कामाला मात्र वाघ आहे. ती आजही शेतातील कामे करते.

सरस्वतीबाईचा विवाह अगदी लहान वयातच द्वारका प्रसाद पाटीदार यांच्याशी झाला. पहिले मूल झाल्यानंतर ती आजारी पडली. तिला टॉयफॉईड झाला होता. टॉयफॉईडमध्ये तिचे आतडे आक्रसून गेले. काहीही खाल्ले तरी त्याचे पचन न होता उलट्या होऊ लागल्या. ती हळूहळू बरी झाली, पण खाल्लेले पचणे बंदच झाले. पतीने खूप उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही.

आता केवळ चहा हाच तिचा आहार आहे. आठवड्यातून एखादे केळे खाल्ले, की झाले.
आजही ती अन्नाचा एक कणही खात नाही. तरीही आरोग्यसंपन्न आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)