शॉर्ट फिल्म कॉर्नर : फकर है!

लघुपटाची सुरुवात एका दहशतवादी कॅम्पपासून होते. येथे ते जगभरात हल्ले करण्याचा कट रचत असतात. या दहशतवाद्यांचा प्रमुख प्रत्येकाला वेगवेगळे देश बॉम्बस्फोट करण्यासाठी देतो. त्यातील सलमान नावाच्या दहशतवाद्याला भारतात पाठविण्यासाठी सिलेक्‍ट करतात. परंतु, त्याची अमेरिका, पॅरिसमध्ये जाण्याची इच्छा असल्याने सलमान सुरुवातीला नाही म्हणतो. मात्र, सलमानला इंग्रजी येत नसल्याने तुला भारतातच जावे लागेल, असे त्यांचा प्रमुख ठणकावून सांगतो.

भारतात जाण्यासाठी सलमानला प्रमुख पूर्णपणे तयार करत असतो. त्यांचा प्रमुख म्हणतो, भारतात जाण्यासाठी तुला तेथील सामान्य नागरिकासारखे वागावे लागेल. भारताची संस्कृती, इतिहास जाणून घ्यावा लागेल. असे म्हणून प्रमुख सलमानच्या हातात काही पुस्तके आणि लॅपटॉप देतो. सलमान ती पुस्तके वाचण्यास सुरुवात करतो. नेटवर सर्च करून महात्मा गांधी, भगतसिंह, राजगुरू यांच्याबद्दल जाणून घेतो. यानंतर आता कसं वाटत आहे? असा प्रश्‍न त्यांचा प्रमुख सलमानला विचारतो. यावर सलमान म्हणतो, माणूस झाल्यासारखे वाटत आहे. हे उत्तर ऐकून प्रमुख खुश होतो व त्याचा हातात बॉम्ब देतो आणि भारतात जाण्यास सांगतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, सलमान स्प्ष्टपणे नकार देत म्हणतो, ऑगस्ट 1947 साली हिंदू, मुसलमान, पारशी, शीख आदी शेकडो स्वातंत्र्यसैनांनी प्राणाची आहुती देऊन भारताला स्वत्तंत्र्य सैनिकांनी प्राप्त करून दिले. एकाच तिरंग्याखाली उभे राहून सर्वानी संविधान लिहिले. यामध्ये जेवढा हक्क एका हिंदूला देण्यात आला. तेवढाच हक्क एका मुसलमानाला देण्यात आला. आणि तेवढाच हक्क शीख आणि पारशी समाजालाही देण्यात आला.

भारत प्रत्येक धर्माला आपले मानतो. एक असा देश जिथे हिंदूंच्या मंदिरातील घंटेसोबत आजान मिळून संपूर्ण भारताला एकतेचा धडा शिकवतात. एका असा देश ज्याच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू आणि मुसलमान दोघेही फाशीवर चढतात. अशा देशात कोणी कसे बॉम्बस्फोटकरू शकते, असे म्हणून सलामन बॉम्बस्फोट करण्यास स्पष्ट नकार देतो. हे ऐकून त्यांचा प्रमुख त्याला शिवीगाळ करतो आणि तू नसशील करणार तर मी स्वतः जाऊन भारतात बॉम्बस्फोट करेल, असे म्हणून प्रमुख सलमानच्या हातातून बॉम्ब हिसकवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, सलमान बॉम्ब देत नाही. झटापटीत तो बॉम्ब अॅक्‍टिव्हेट होतो. हे पाहून त्यांचा प्रमुख दूर पळून जातो. परंतु, त्याचवेळेस भारताचे राष्ट्रगीत लागल्याने सलमान तो बॉम्ब घेऊन तेथेच उभा राहतो. आणि स्वतःचे आयुष्य संपवितो.

आज काही जण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर काही दहशतवादी संघटना तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करतात. परंतु, स्वातंत्र्यपूर्व वेगवेगळ्या जाती-धर्मातील लोकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य दिले. भारताच्या संविधानाने सर्वाना सामावून घेतले. अशा या भारत देशाबद्दल आपल्या सर्वानाच ‘फकर है’ म्हणायला पाहिजे.

– श्‍वेता शिगवण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)