प.पू. 108 पुलकसागरजी महाराज यांचे शहरात स्वागत

विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे साकारण्यात आला मंगल प्रवेश

निगडी – प. पू. 108 पुलकसागरजी महाराज यांचा शहरात मंगल प्रवेश करण्यात आला. त्यांच्या आगमनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. निगडी येथील जैन मंदिरात रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमाने मंगल प्रवेश झाला. शहरात विविध ठिकाणी त्यांची उत्साहात पाद्यपूजा करण्यात आली.

निगडी येथील जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळी साडेसात वाजता प्राधिकरण येथून मिरवणुकीला सुरूवात झाली. ही मिरवणूक संभाजी चौक, भेळ चौक, शांतीसागर चौक मार्गे स्पाईन रस्त्याने मिरवणूक भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे पोहोचली. यावेळी सकल समितीच्या अध्यक्षा शोभा धारीवाल, जान्हवी धारीवाल, उपाध्यक्ष मिलिंद फंडे व अजित पाटील, अरविंद जैन, चकोर गांधी, सुरेंद्र गांधी, विरेंद्र जैन, जितेंद्र शहा, सुदीन खोत, संजय नाईक, विजय भिलवडे, अभय कोठारी, जितेंद्र शहा, सुजाता शहा, प्रकाश कटारिया, मोतीलाल चोरडिया, वीरकुमार शहा, प्रकाश शेडबाळे, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, नगरसेविका शर्मिला बाबर आदी उपस्थित होते.

स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे खास आकर्षण रथ, ढोलपथक, राजस्थानी संगीत मंडळ, लोकप्रतिनिधी, कलश घेतलेल्या महिला मंडळ व अनेक जैन श्रावक यांचा समावेश होता. मंदिरामध्ये महाराजांची पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर भगवंताचा अभिषेक झाला. दि. 14 ते 24 सप्टेंबर या कालावधीत पुलकसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात पर्युषणपर्वाचे महत्व याविषयावर व्याख्यान झाले. यावेळी प.पू. 108 पुलकसागरजी महाराज यांनी दान या विषयावर व्याख्यान दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)