प्लॅस्टीक निर्मुलनामुळे पर्यावरणाचे संरक्षण

मंचर- श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरातील कचरा आणि प्लॅस्टीक निर्मुलनाचे काम विविध संस्था करत असल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होत आहे, असे मत जुन्नर वनविभागाचे वनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटील यांनी व्यक्त केले.
पर्यावरण जागृती अंतर्गत भीमाशंकर मंदिर व परिसरातील प्लॅस्टिक-थर्माकॉलचा दोन ट्रॅक्‍टर ट्रॉली कचरा गोहा करून भीमाशंकर वनसमितीकडे सुपूर्त करण्यात आला. भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ पुणे आळंदी, संतनगर मिंत्रमंडळ मोशी प्राथमिक पुणे, भीमाशंकर अभयारण्य वनविभाग व भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आला. त्यासाठी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
वनअधिकारी एस. के. फटांगरे यांनी प्रत्येक झाडाचे वैज्ञानिक व आरोग्यविषय महत्व सांगितले. त्याचबरोबर भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षक अधिकारी डी. आर. झगडे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले. वनपाल एस. बी. मुलानी व भीमाशंकर वनसमितीचे अध्यक्ष दत्तात्रय हिले यांनी यासाठी सहकार्य केले.
सुरूवातीला मंचर बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली. यावेळी स्वयंसेवकांनी हातात पर्यावरणपूरक बोर्ड घेऊन घोषणा देत पर्यावरण व स्वच्छता अभियान विषयक जागृती केली. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण वाळुंज, सुनिल काटकर, बाबासाहेब गरुड, गणेश चौधरी, अविनाश खोसे, निष्कुंज रेंगे, जयवंत सावंत, सचिन दोरगे, सुहास चव्हाण, सुनिल बांगर, सागर भोईर, शांताराम भिवरे, सूरज डोले, सुरेश शर्मा, समीर कालेकर, किशोर हिरवे, कर्नल तान्हाजी अरभुज, चंद्रकांत धोराचे, उध्दव जाधव, अनंथा घोलप, सविता सैद, आशा बोऱ्हाडे, जनाबाई राक्षे, राजू मोरडे, अपूर्वा सैद, भीमाशांकर वनसमितीचे अध्यक्ष अक्षदा पडवळ, दत्तात्रय हिले समवेत संतनगर मित्र मंडळ व इंद्रायणी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी भीमाशंकर परिसर स्वच्छ करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)